आतून-बाहेरून शरीर स्वच्छ करतो कडुनिंब!

कडुनिंब औषधी वनस्पती आहे, याची माहिती तर अनेकांना असेल... पण, याचा वापर कोणकोणत्या आजारांवर होऊ शकतो, याची योग्य माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. 

Updated: Oct 17, 2015, 04:31 PM IST
आतून-बाहेरून शरीर स्वच्छ करतो कडुनिंब! title=

मुंबई : कडुनिंब औषधी वनस्पती आहे, याची माहिती तर अनेकांना असेल... पण, याचा वापर कोणकोणत्या आजारांवर होऊ शकतो, याची योग्य माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. 

वर्षभर पुरेशा प्रमाणात तुम्हाला कडुनिंबाचा पाला कुठेही उपलब्ध होऊ शकतो. आयुर्वेदात कडुनिंबाच्या अनेक फायद्यांचा उल्लेख करण्यात आलाय. या पानांचा ज्युसही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. 

अधिक वाचा - कॅन्सरवर जालिम कडूनिंब

त्वचेसाठी उपयोगी

कडुनिंबात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळतं. त्यामुळे, चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेडस, पुरळ येणं, तेलकट त्वचा, त्वचा निस्तेज पडणे अशा विविध समस्यांवर कडुनिंबाचा पाला उपयोगी ठरतो.  
 
दम्यावर कडुनिंबाचा उपाय
तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर त्यासाठी कडुनिंब हा अत्यंत उपयोगी पदार्थ आहे. कफ, खोकला आणि श्वास नियंत्रित करण्यासाठी कडुनिंबाचा वापर होतो. श्वसन विकारांवर कडुनिंब दीर्घकाळापर्यंत आराम देतो. 

अल्सरवर उपयोगी
पोटाच्या विविध विकारांवर कडुनिंब हे रामबाण उपाय आहे. शरीरातील पीएच स्तर नियंत्रणात ठेवून अल्सरवर मात करण्यासाठी याचा वापर केला जातो. 

मधुमेहावर उपचार
कडुनिंबाचे पानांचा उपयोग तुमच्या शरीरातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना कडुनिंबाच्या पानांचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. शरीरात गेल्यानंतर कडुनिंब इन्सुलिनप्रमाणे काम करतो. 

पचनप्रक्रियेत मदत
कडुनिंबात फायबरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे, तुम्हाला अन्नपदार्थ पचण्यासाठी याचा मोठा फायदा होतो. गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तरी कडुनिंब त्यापासून सुटका करून देण्यासाठी मदत करतं. शरीराची पाचनक्षमता वाढवण्यासाठी कडुनिंब मदत करतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.