पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण

आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण करण्याची ही नववी वेळ आहे. यानंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 15, 2012, 08:07 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण करण्याची ही नववी वेळ आहे. यानंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं. याप्रसंगी भाषण करताना पंतप्रधान म्हणाले, की जागतिक आणि नैसर्गिक आपत्तींची झळ देशाला बसत असली तर देश यातून नक्कीच मार्ग काढेल.
वैश्विक मंदीचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होत आहेत. तसंच समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे अडचणींमध्ये भरच पडली आहे. मात्र, देशात अन्न-धान्याचा मुबलक साठा आहे. तसंच यावर्षी दरडोई उत्पन्न ९ टक्क्यांनी वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले
पंतप्रधानांनी यावेळी स्पष्च केले की देशातील निम्म्याहून अधिक जनतेची आता बँकेत खाती आहेत. देशासमोर असणाऱअया गरिबी, निरक्षरता यांसारख्या समस्यांवर लवकरच मार्ग कढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. पुढील पाच वर्षात देशातील प्रत्येक घरात वीज पुरवठा होईल, असंही आश्वासन दिले.