नवी दिल्ली : पीओकेमध्ये भारतीय लष्कराकडून केल्या गेलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर एयरफोर्स प्रमुख अरूप राहा यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. राहा यांनी म्हटलं आहे की, सर्जिकल स्ट्राइक हे खूपच संवेदनशील प्रकरण आहे, यावरर नाही बोलणार.'
२८ सप्टेंबरला रात्री भारतीय लष्कराने पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांना नष्ट केलं होतं. यामध्ये ३० ते ४० दहशतवाद्यांचा खात्मा देखील केल्याचं बोललं जात होतं. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कारने हे सर्जिकल स्ट्राईक केलं होतं.
पठानकोट एयरबेसवर झालेल्या हल्ल्यामध्ये सात जवान शहीद झाले होते. हवाई दलाचे प्रमुख अरूप राहा यांनी म्हटलं की, 'राफेल क्लासचे विमान कोणत्याही एयरफोर्ससाठी अभिमानाची गोष्ट आहे. अभिमान आहे की त्याच्या खरेदीवर सहमती झाली आहे.'