उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, यादव कुटुंब एक : मुलायम सिंग

मी लोहिया यांच्या मार्गावरून चालतो, असे सांगित पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी सर्व काही ठिक असल्याचे सांगितले.  

Updated: Oct 25, 2016, 03:10 PM IST
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, यादव कुटुंब एक : मुलायम सिंग title=

लखनऊ : मी लोहिया यांच्या मार्गावरून चालतो, असे सांगित पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी सर्व काही ठिक असल्याचे सांगितले. काही लोकांकडून षडयंत्र रचण्याचा प्रयत्न. मात्र अशा लोकांना जनाधार नाही. परिवार आणि पार्टीमध्ये एकजूट आहे, असे ते म्हणालेत.

मुलायम यांच्या पत्रकार परिषदेत सर्व बरखास्त मंत्र्यांची उपस्थिती. मात्र, मुख्यमंत्री अखिलेश यादव हे अनुपस्थित होते. त्यामुळे वाद क्षमला नसल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी अखिलेश सध्या मुख्यमंत्री आहेत. मात्र 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर पुढील मुख्यमंत्र्याबाबत निर्णय घेऊ, असे विधान मुलायम सिंग यांनी केल्याने वाद उफाळण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातल्या यादव कुटुंबातलं वादळ आज शमण्याची शक्यता होती. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव गैरहजर राहिल्याने चर्चा अधिकच रंगली आहे. आज सकाळपासून लखनौमध्ये पुन्हा बैठकांचं सत्र सुरू झालंय. मुलायमसिंह आणि अखिलेश यादव या दोघांच्याही घरी बैठका झाल्यात. अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्या समेट घडवून आणण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान शिवपाल यादव स्वतः समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात पोहचले आहेत. कालपर्यंत आपल्या भूमिकेवर अखिलेश यादव यांच्या गोटातूनही तहाचे संकेत मिळू लागले आहेत. आज संध्याकाळपर्यंत शिवपाल यादव आणि त्यांच्या तीन समर्थकांना मंत्रिमंडळात परत घेतलं जाण्याची शक्यता आहे.