बाबा हरदेव यांची मुलगी होणार निरंकारी मिशनची प्रमुख

संत निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं निधन झाल्यानंतर आता त्यांची मुलगी सुभिक्षा संत निरंकारी मिशनची जबाबदारी सांभाळणार आहे. ६२ वर्षाचे बाबा हरदेव सिंह यांचं निधन कॅनडामध्ये एका कार अॅक्सिडेंट मध्ये झालं होतं. त्यानंतर त्यांचे जावई अनवीत सेतिया यांचं ही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आली होती.

Updated: May 17, 2016, 10:39 PM IST
बाबा हरदेव यांची मुलगी होणार निरंकारी मिशनची प्रमुख title=

मुंबई : संत निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं निधन झाल्यानंतर आता त्यांची मुलगी सुभिक्षा संत निरंकारी मिशनची जबाबदारी सांभाळणार आहे. ६२ वर्षाचे बाबा हरदेव सिंह यांचं निधन कॅनडामध्ये एका कार अॅक्सिडेंट मध्ये झालं होतं. त्यानंतर त्यांचे जावई अनवीत सेतिया यांचं ही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आली होती.

बाबा हरदेव सिंह २५ एप्रिलला त्यांची छोटी मुलगी सुभिक्षा आणि जावई अनवीत सेतिया यांच्यासोबत अमेरिका आणि कॅनाडामध्ये प्रचार यात्रेसाठी गेले होते. बाबा हरदेव आध्यात्मिक संस्था संत निरंकारी मिशनचे प्रमुख होते. याची स्थापना बाबा बुटा सिंह यांनी १९ व्या शतकात केली होती. संत निरंकारी आंदोलन सिख धर्मच्या मुख्यधारेशी वेगळा आहे.

जगभरात निरंकारी मिशनचे अनेक अनुयायी आहेत. हरदेव सिंह आणि त्यांच्या जावई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.

१८ मे या दिवशी दिल्लीतील बुराडी येथे निरंकारी समागम ग्राउंड नंबर ८ येथे बाबा हरदेव यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. अंतयात्रा सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे तर दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.