BBC डॉक्युमेंटरी : निर्भयाचे आई-वडील नाराज, प्रसारित करा - जावेद अख्तर

मोठ्या विरोधानंतरही BBCनं निर्भयावरील डॉक्युमेंटरी प्रसारीत केलीच. BBCवृत्तवाहिनीच्या या निर्णयावर निर्भयाच्या आई आणि वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ही डॉक्युमेंटरी भारतातही दाखवावी, अशी भूमिका ख्यातनाम गीतकार, खासदार जावेद अख्तर यांनी घेतली आहे.

PTI | Updated: Mar 5, 2015, 08:41 PM IST
 BBC डॉक्युमेंटरी : निर्भयाचे आई-वडील नाराज, प्रसारित करा - जावेद अख्तर title=

नवी दिल्ली : मोठ्या विरोधानंतरही BBCनं निर्भयावरील डॉक्युमेंटरी प्रसारीत केलीच. BBCवृत्तवाहिनीच्या या निर्णयावर निर्भयाच्या आई आणि वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ही डॉक्युमेंटरी भारतातही दाखवावी, अशी भूमिका ख्यातनाम गीतकार, खासदार जावेद अख्तर यांनी घेतली आहे.

निर्भयाच्या बलात्काऱ्याची मुलाखत दाखवू नये, असे आदेश केंद्र सरकार आणि कोर्टानं दिल्यानंतरही बीबीसीनं ती डॉक्युमेंट्री प्रसारीत केली. ब्रिटनमध्ये या माहितीपटाचं प्रसारण करून बीबीसीनं आपली मुजोरी दाखवून दिली आहे.  याआधीच्या नियोजनानुसार ८ मार्चला जागतिक महिला दिनी या डॉक्युमेंटरीचं प्रसारण होणार होतं. मात्र यावरून वाद निर्माण झाल्यानंतर बीबीसीनं आजचं तिचं प्रसारण केलं. 

बीबीसीच्या या निर्णयामुळे भारतामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. केंद्र सरकार आणि कोर्टाचे आदेश मोडून ही डॉक्युमेंट्री दाखवणाऱ्या बीबीसीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे भारतात हा माहितीपट दाखवला जाणार नसल्याचं या वाहिनीनं स्पष्ट केलंय. दरम्यान, बीबीसीनं नियमांचं उल्लंघन केलं असेल तर योग्य कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

तसेच माझ्या मुलीचे नाव प्रसारित करु नये, असे सांगूनही मुलीचे नाव जाहीर करण्यात आले. याबाबत आम्ही बीबीसीविरोधात न्यायालयात आव्हान देणार असल्याचे निर्भयाच्या आई-वडिलांनी सांगितले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.