'आप'चे खासदार अडकले नव्या वादात

आम आदमी पार्टीचे पंजाबमधले खासदार भगवंत मान नव्या वादात सापडले आहेत.

Updated: Jul 21, 2016, 10:10 PM IST
'आप'चे खासदार अडकले नव्या वादात

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे पंजाबमधले खासदार भगवंत मान नव्या वादात सापडले आहेत. भगवंत मान यांनी चक्क संसदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न कसे निवडले जातात याचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि ते सोशल नेटवर्किंगवर टाकलं. 

यामुळे संसदेच्या सुरक्षेलाच त्यांनी आव्हान दिल्याचा आरोप भाजपा, अकाली दल आणि काँग्रेसनं केला आहे. या टीकेनंतरही मान आपल्या कृतीवर ठाम आहेत. आपण यात काहीही गैर केलेलं नाही, इतकंच नव्हे, तर उद्यादेखील आपण असं चित्रीकरण करू असं त्यांचं म्हणणं आहे.