नवी दिल्ली : भारताचे माजी सैनिक सुभेदार रतन सिंह यांचे बुधवारी पंजाबच्या टिब्बा येथे निधन झाले. रतन सिंह यांनी १९७१ सालच्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने उत्तर भारतातील हवाई तळांवर हल्ला केला. त्यानंतर भारतानेही पाकिस्तानवर हल्ला चढवला. यावेळी रतन सिंह यांनी राजस्थानच्या लोंगेवाला येथील सीमेवर पाकिस्तानविरूद्ध लढा दिला होता.
बॉर्डर या हिंदी सिनेमात रतन सिंह यांच्यावर आधारीत व्यक्तिरेखा साकारण्यात आली होती. अभिनेता पुनित इस्सार याने ही भूमिका साकारली होती.
सुभेदार रतन सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जवानांनी हजारो पाकिस्तानी सैनिकांचा युद्धात सामना केला होता. रतन यांना त्यांच्या युद्धातील कामगिरीसाठी वीरचक्र देऊन गौरवण्यात आले होते.