हरियाणाच्या मुख्यमंत्री ताफ्यातील गाडीनं धडक दिल्यानं एक जण ठार

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या ताफ्यातील एका गाडीनं धडक दिल्यानं पादचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

PTI | Updated: Mar 3, 2015, 02:06 PM IST
हरियाणाच्या मुख्यमंत्री ताफ्यातील गाडीनं धडक दिल्यानं एक जण ठार title=

करनाल: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या ताफ्यातील एका गाडीनं धडक दिल्यानं पादचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

सोमवारी रात्री करनाल मुख्यमंत्री चंडिगढहून दिल्लीला जात असताना हा करनाल पासून २० किमी अंतरावर तारौरी इथं हा अपघात घडला. एक पदचारी रस्ता ओलांडत असताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका गाडीनं या व्यक्तीला धडक दिली असता त्या व्यक्तीला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

तसंच ज्या गाडीनं धडक दिली त्या गाडीतील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. या अपघातात जीव गमवलेल्या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस अधीक्षक अभिषेक गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात राष्ट्रीय महामार्ग एक वर झाला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.