नवी दिल्ली : योग आणि आहार तज्ज्ञ करुणा कोडवानी यांनी केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने इनकम टॅक्सच्या एका अधिकाऱ्याला आणि सीएला अटक केली आहे. सीबीआयला पत्र लिहून करुणा कोडवानीने आयकर विभागाचा अधिकारी नवीन कुमार आणि सीए विनय गुप्ता यांच्याविरोधात ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार नोंदवली होती.
नवीन कुमार आणि सीए विनय गुप्ता इनकम टॅक्स असेसमेंटसंबंधी १० लाखांची लाच मागत होते. पैसे न दिल्यास मोठी कारवाई करण्याची धमकी देत होता असं करुणा कोडवानीने म्हटलं आहे.
करुणा कोडवानीने वडिलांच्या मदतीने सीबीआयकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीनंतर सीबीआयने दोघांना अटक करुन चौकशी सुरु केली आहे.