केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा बदल?

केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाचे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी य़ांनी दिले आहेत. पंतप्रधानांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली असून फेरबदलाबाबतची चर्चा झाल्याचं समजतंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 16, 2012, 06:59 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाचे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी य़ांनी दिले आहेत. पंतप्रधानांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली असून फेरबदलाबाबतची चर्चा झाल्याचं समजतंय.
विशेष म्हणजे पंतप्रधान यांच्या भेटीनंतर लगेचच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यामुळं फेरबदलाची शक्यता बळावली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं युपीएचा पाठिंबा काढल्यामुळं काही मंत्रिपदे रिक्त आहेत.
या जागांवर काँग्रेसच्या काही नव्या चेह-यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे.