नवी दिल्ली : कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं काँग्रेस नेते आणि उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसा राज्यमंत्री दसारी नारायण राव आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
झारखंडच्या बीरभूममधील अमरकोंडा मुरगादंगल कोळसा खाण वाटप प्रकरणाशी संबंधित हे प्रकरण आहे. सीबीआयनं भारतीय दंड विधानाच्या कलम १२ बी आणि कलम ४२० अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं.
विशेष न्यायाधीश भरत पराशर यांच्या कोर्टात याबाबतची पुढील सुनावणी होणाराय. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड आणि गगन स्पांजी आयर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी भ्रष्टाचार करून आणि चुकीची माहिती देऊन कोळसा खाणीचे वाटप पदरात पाडून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. त्यावेळी दसारी नारायण राव हे कोळसा खात्याचे राज्यमंत्री होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.