निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत ५७० कोटी जप्त, ३ कंटेनरचा वापर

मतदानाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात ५७० कोटी रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम हस्तगत कऱण्यात आलेय. ही रक्कम ३ कंटेनरमधून आणली होती.

PTI | Updated: May 14, 2016, 02:09 PM IST
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत ५७० कोटी जप्त, ३ कंटेनरचा वापर title=

तिरुप्पूर : मतदानाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात ५७० कोटी रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम हस्तगत कऱण्यात आलेय. ही रक्कम ३ कंटेनरमधून आणली होती.

तामिळनाडूमध्ये सोमवारी मतदान होतंय. त्यामुळे या घटनेचं महत्त्व वाढलंय. ही रक्कम मतं विकत घेण्यासाठी पाठवली जात होती का, याचा तपास केला जातोय. निवडणूक आयोगानं निमलष्करी दलाच्या मदतीनं पाठलाग करून हे कंटेनर पकडलेत. 

कंटेनर अद्याप उघडण्यात आले नसले, तरी ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाची असून ती विजयवाड्याला पाठवण्यात येत होती, असा दावा या कंटनेर्सच्या चालकांनी केलाय. स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलंय. कागदपत्रांची तपासणी करण्यात येतेय. ही कागदपत्र समाधानकारक असल्यास कंटेनर्स सोडून देण्यात येतील, असं मुख्य निवडणूक अधिकारी राजेश लखोनी यांनी सांगितलंय. 

मात्र वाहनांचे क्रमांक कागदपत्रांशी मिळतेजुळेत नसल्यानं शंका बळावली असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आजवर राज्याच्या विविध भागातून १०० कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.