जयपूरमध्ये हवेत टांगलेल्या 'गाई'मुळे वाद..

 जयपूर आर्ट समिटमध्ये कलाकारांनी एअर बलून आर्टमध्ये गाय वाचविण्याचा संदेश देण्यासाठी हवेत गाईच्या आकाराचा फुगा सोडल्यानंतर जोरदार वाद सुरू झाला. 

Updated: Nov 22, 2015, 12:33 PM IST
जयपूरमध्ये हवेत टांगलेल्या 'गाई'मुळे वाद.. title=

जयपूर :  जयपूर आर्ट समिटमध्ये कलाकारांनी एअर बलून आर्टमध्ये गाय वाचविण्याचा संदेश देण्यासाठी हवेत गाईच्या आकाराचा फुगा सोडल्यानंतर जोरदार वाद सुरू झाला. 

जयपूरमध्ये सुरू असलेल्या आर्ट समिटमध्ये काही कलाकारांनी पॉलिथिनच्या कचऱ्यापासून गाईला वाचविण्याचा संदेश देण्यासाठी गाईच्या आकाराचा एक फुगा तयार करून बराच काळ हवेत टांगला. पुतळा पाहू काही हिंदू संघटना भडकल्या. जयपूर आर्ट समिटमध्ये अशा प्रकारे गाईच्या पुतळ्याला हवेत लटकविल्याविरोधात हिंदू संघटनांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. वाद इतका वाढाला की पोलिसांनी घटना स्थळी सुरक्षा वाढवावी लागली.

पोलिसांनी काढला फुगा...
लोकांचा राग पाहून पोलिसांनी कलाकारांना गाईचा फुगा लगेच उतरविण्यासा सांगितले. त्यानंतर गाईला जयपूर आर्ट समिटमधून हद्दपार केले. कलाकारांनी वारंवार समजविण्याचा प्रयत्न केला पण हिंदू संघटना आणि पोलिसांनी त्यांची एक गोष्ट ऐकली नाही. त्यानंतर काही कलाकारांना ताब्यात घेऊन ठाण्यात घेऊन गेले. गाईचा पुतळा पुन्हा लावणार नाही या अटीवर त्यांना सोडण्यात आले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.