करंट अकाऊंट धारकांना सरकारचा दिलासा

आर्थिक व्यवहार संबंधातील विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी करंट अकाउंट असणाऱ्या व्यक्तींसाठी एक दिलासा दायक बातमी दिली आहे. सरकारने कमीत कमी तीन महिने जुनं करंट अकाऊंट असणाऱ्या लोकांना दिलासा दिला आहे. कंरट अकाऊंट असणाऱ्या व्यक्ती आता प्रति आठवड्याला ५० हजार रुपये काढू शकणार आहेत.

Updated: Nov 14, 2016, 06:01 PM IST
करंट अकाऊंट धारकांना सरकारचा दिलासा title=

नवी दिल्ली : आर्थिक व्यवहार संबंधातील विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी करंट अकाउंट असणाऱ्या व्यक्तींसाठी एक दिलासा दायक बातमी दिली आहे. सरकारने कमीत कमी तीन महिने जुनं करंट अकाऊंट असणाऱ्या लोकांना दिलासा दिला आहे. कंरट अकाऊंट असणाऱ्या व्यक्ती आता प्रति आठवड्याला ५० हजार रुपये काढू शकणार आहेत.

करंट अकाउंट हे व्यावसायिकांसाठी असतं. दररोज होणाऱ्या व्यवहारांना लक्षात ठेवून ते बनण्यात आलं आहे. या अकाऊंट धारकांना दिवसभरात पैसे भरणे किंवा काढण्यासाठी कोणतीही लिमीट नसते.

शक्तिकांत दास यांनी म्हटलं की लवकरच २००० च्या नव्या नोटा एटीएममधून मिळणे सुरु होणार आहे. देशातील 1.3 लाख पोस्ट ऑफीसला नोटा पुरवल्या जाणार आहेत. लवकरच स्थिती सामान्य होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.