'जे माझ्या मुलासोबत झाले ते कोणासोबतही होऊ नये'

दादाराव भिलोरे रस्त्त्यावरुन जाताना जेव्हा खड्डा पाहतात तेव्हा तो खड्डा बुजवण्यास सुरुवात करतात. तुम्हाला हे ऐकून थोडे विचित्र वाटेल. पण नाही जेव्हा एक खड्डा भरुन निघतो तेव्हा ते दुसरा खड्डा शोधतात आणि त्याला बुजवण्यास सुरुवात करतात. 

Updated: Feb 1, 2016, 03:59 PM IST
'जे माझ्या मुलासोबत झाले ते कोणासोबतही होऊ नये' title=

मुंबई : दादाराव भिलोरे रस्त्त्यावरुन जाताना जेव्हा खड्डा पाहतात तेव्हा तो खड्डा बुजवण्यास सुरुवात करतात. तुम्हाला हे ऐकून थोडे विचित्र वाटेल. पण नाही जेव्हा एक खड्डा भरुन निघतो तेव्हा ते दुसरा खड्डा शोधतात आणि त्याला बुजवण्यास सुरुवात करतात. 

याचे कारणही वेगळेच आहे. याच खड्ड्यामुळे भिलोरे यांना त्यांचा मुलगा गमवावा लागतो. आपल्या मुलासोबत जे झाले ते इतर कोणासोबत होऊ नये हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. 

गेल्यावर्षी २८ जुलै रोजी भिलोरे यांचा मुलगा प्रकाश पॉलिटेक्निक कॉलेजमधून परतत होता. यावेळी जोगेश्वरी-विक्रोली लिंक रोडवरील खड्ड्यामुळे त्याचा अपघात झाला होता. या अपघातात १६ वर्षीय प्रकाशचा मृत्यू झाला. तेव्हापासून खड्डे बुजवण्याचे त्यांचे हे काम अविरत सुरु आहे. 

भिलोरे हे उपजिविकेसाठी मरोळच्या विजयनगर भागात भाजी विकण्याचे काम करतात. प्रकाश हा त्यांच्या घरातील पहिला मुलगा होता जो इंग्रजी माध्यमात शिकला होता. प्रकाशच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांविरोधात कारवाई केली जावी यासाठी त्यांचा पाच महिन्यांपासून लढा सुरु आहे. आपल्या मुलासोबत जे झाले ते इतर कोणासोबतही होऊ नये यासाठी हा बाप रस्त्त्यावरील खड्डे बुजवतोय.