दिल्ली गँगरेपः बेशुद्ध तरुणीचे अश्रू थांबतच नाही

नवी दिल्ली गँगरेपच्या पीडित मुलीची प्रकृती गंभीर झाली असून २३ वर्षांच्या या युवतीवर अमानुषपणे जो अत्याचार केला त्याची कल्पना तीने कधीच केली नसेल

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 19, 2012, 01:21 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
नवी दिल्ली गँगरेपच्या पीडित मुलीची प्रकृती गंभीर झाली असून २३ वर्षांच्या या युवतीवर अमानुषपणे जो अत्याचार केला त्याची कल्पना तीने कधीच केली नसेल. तिच्या शरिराच्या विविध अंगांना गंभीर जखमा आहे. जेव्हा बलात्कारींचे मन भरले तेव्हा त्यांनी नग्नावस्थेत तीला चालत्या बस मधून फेकून दिले.
बलात्काराचा असा भयानक प्रकार मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही, असे पीडित मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. ज्यात मानसिक छळासह शरीराला अशा प्रकारे नुकसान पोहचविण्यात आले, की अंगावर काटा येतो. व्हेंटीलेटरवर असलेली ही युवती बेशुद्ध आहे परंतु, त्याचा डोळ्यातून अश्रू सतत वाहत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

या मुलीने जे दुःख सहन केले आहे, अत्यंत वेदनादायक आहे. काल ऑपरेशननंतर तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा झाली परंतु आज पुन्हा तीची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यामुळे तिला पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तिचे प्लेटलेट(पांढऱ्या पेशी) अचानक कमी झाल्या. रक्तदाबही असामान्य आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
आगामी २४ तास तरुणीसाठी खूपच महत्त्वाचे आहे. या २४ तासात तिची प्रकृती सुधारली तर तिच्या वाचण्याच्या शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.