नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीसंदर्भातली आरटीआय नाकारणा-या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या अधिका-याला 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
माहितीच्या अधिकारांतर्गत मोदींच्या पदवीबाबत माहिती मागवण्यात आली होती. मात्र ही माहिती देण्यास युनिव्हर्सिटीच्या केंद्रीय माहिती अधिका-याने नकार दिला होता. त्यामुळं केंद्रीय माहिती आयोगानं त्यांना 25 हजारांचा दंड ठोठावलाय. मिनाक्षी सहाय यांनी याप्रकरणी चुकीचं वर्तन केलंय असं आयोगानं नमुद केलंय.त्यामुळेच त्यांना दंड ठोठावल्याचंही आयोगानं म्हटलं आहे.