शशी थरुर-मेहर तरार फोटो व्हायरल, सुनंदा पुष्कर प्रकरणाला वेगळे वळण

सुनंदा पुष्कर हत्येप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सुनंदा पुष्करचे पती, ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांचा एकत्र फोटोच हाती आलाय.

Updated: Jan 13, 2015, 06:34 PM IST
शशी थरुर-मेहर तरार फोटो व्हायरल, सुनंदा पुष्कर प्रकरणाला वेगळे वळण title=

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर हत्येप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सुनंदा पुष्करचे पती, ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांचा एकत्र फोटोच हाती आलाय.

हा दुबईतला फोटो असून, जून २०१३ मध्ये दुबईतल्या एका हॉटेलात एका कार्यक्रमात थरूर आणि तरार एकत्र आले होते. थरूर आणि तरार यांच्यातल्या वाढत्या घनिष्ठ संबंधांमुळंच सुनंदा पुष्कर नाराज होत्या, असं सांगितलं जातंय. त्यातच दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार आणि सुनंदाची मैत्रिण नलिनी सिंह यांनीही पोलिसांकडे तसा जबाब नोंदवलाय.

थरूर आणि तरार तीन दिवस दुबईत एकत्र राहिले होते, अशी माहिती सुनंदा पुष्करनं तिच्या मृत्यूपूर्वी काही तास आधी मला दिली होती. १६ आणि १७ जानेवारी २०१४ च्या मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी सुनंदाचा माझ्या मोबाईलवर फोन आला. ती खूप रडत होती, असा खुलासा नलिनी सिंह यांनी केलाय. त्यामुळं पुष्कर हत्या प्रकरणामध्ये पती, पत्नी और वो असा नवा ट्विस्ट निर्माण झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.