वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या जयापूरमधले गावकरी उघट्यावर शौचाला बसले तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. 500 रुपयांचा हा दंड असणार आहे. जयापूरमधल्या या गावात आदर्श ग्राम योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यात आली आहेत, पण तरीही गावकऱ्यांमध्ये जनजागृती झाली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
2014 मध्ये पंतप्रधानांनी जयापूर हे गाव दत्तक घेतलं होतं. पंतप्रधान हे स्वत:च देशभरात स्वच्छ भारत अभियानासाठी जनजागृती करत आहेत, पण त्यांनी दत्तक घेतलेल्या गावामधलेच नागरिक उघड्यावर शौचला बसतात, ही गोष्ट शरमेची आहे. अशी प्रतिक्रिया या गावच्या सरपंचांनी दिली आहे.