नवी दिल्ली : वादग्रस्त माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंत आपल्या आवडीच्या मतदारसंघासाठी आग्रही आहे. त्यानं आज पक्षाच्या दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट दिली. त्याला आगामी निवडणुकीत कोचीमधल्या त्रिपुनीथारा मतदारसंघातून निवडणूक लढायची आहे.
राज्यातलं पक्षाच्या नेतृत्वानं त्याच्यापुढे एर्नाकुलमचा पर्याय ठेवलाय. श्रीसंत स्वतः कोचीचा असल्यामुळे त्रिपुनीथारामधून लढण्यास उत्सूक आहे. तिथून तिकिट मिळावं यासाठी तो पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. आपल्या पसंतीच्या मतदारसंघातून तिकिट मिळणार नसेल, तर निवडणुकीत पक्षाचा प्रचार करण्याची तयारी असल्याचं श्रीसंतनं म्हटलंय.