...जेव्हा महिला पोलीसही ठरते सामूहिक बलात्काराची शिकार

उत्तरप्रदेशमध्ये इटाहून झाशीला ड्युटीवर गेलेल्या महिला कॉन्स्टेबलही सामूहिक बलात्काराची शिकार ठरल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय. 

Updated: Oct 6, 2015, 03:36 PM IST
...जेव्हा महिला पोलीसही ठरते सामूहिक बलात्काराची शिकार title=
प्रातिनिधिक फोटो

लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये इटाहून झाशीला ड्युटीवर गेलेल्या महिला कॉन्स्टेबलही सामूहिक बलात्काराची शिकार ठरल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय. 

दोन शिपायांसहीत तीन जणांनी आपल्यावर एका गाडीत सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पीडित महिला कॉन्स्टेबलनं नोंदवलीय.

आयजी प्रकाश डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इटावा जिल्ह्यातील एका महिला शिपायाला ड्युटीवर झाशीला पाठवण्यात आलं होतं. तिथून परतल्यानंतर महिला शिपायानं आपल्यावर 3 ऑक्टोबर रोजी झाशीहून परतताना आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवलीय. 

झाशीहून परतताना आपण बसची वाट पाहत असतानाच एक व्हॅन आपल्याजवळ येऊन उभी राहिली. ज्यामध्ये दोन शिपाई बसलेले होते. त्यांनी आपणही इटावाला जात असल्याचं सांगितल्यानं महिलेनं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि गाडीत बसली. काही अंतरावर गेल्यानंतर या शिपायांनी आणि गाडीच्या चालकानं महिलेसोबत सामूहिक बलात्कार केला, अशी तक्रार या महिलेनं नोंदवलीय. 

एसएसपींनी या प्रकरणाला गंभीरतेनं घेतलंय. दोन्ही आरोपी अजय यादव (झाशी) आणि राजा (तैनाती ओरय्या) या शिपायांसहीत तीन लोकांविरुद्ध सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.