एचएमटी घड्याळची टिक टिक होणार बंद!

एकीकडे जगभर अॅपल वॉचची चर्चा सुरु असतांना दुसरीकडे एचएमटी ही एकेकाळची आघाडीची घडयाळ कंपनी बंद पडतेय. 

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 11, 2014, 11:50 AM IST
एचएमटी घड्याळची टिक टिक होणार बंद! title=

नवी दिल्ली: एकीकडे जगभर अॅपल वॉचची चर्चा सुरु असतांना दुसरीकडे एचएमटी ही एकेकाळची आघाडीची घडयाळ कंपनी बंद पडतेय. 

भारतात ‘घडयाळ म्हणजे एचएमटी’, असं समीकरण एकेकाळी होतं. 1961साली स्थापन झालेली ही कंपनी सतत तोटयात गेल्यामुळं सरकारनं ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. हा आहे बदलत्या काळाचा महिमा. बदलत्या काळाप्रमाणे तुम्ही बदलला नाही तर तुमचं अस्तित्वचं नष्ट होतं, हे एचएमटी बंद पडण्यावरुन दिसतं. 

पण एचएमटीची आठवण मात्र भारतीयांना येतच राहिल. एकेकाळी एचएमटी म्हणजे सगळ्यात लोकप्रिय घडयाळ होतं. शाळेत जाणाऱ्या मुलांना वाढदिवसाला किंवा चांगले मार्क मिळाल्यानंतर एचएमटी घडाळ्याची भेट दिली जायची. सध्याच्या पिढीला एचएमटी घडयाळ म्हणजे आई वडिलांचं आणि आजोबांचं घडयाळ म्हणून कायम आठवत राहिल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.