सोन्याच्या वैयक्तिक ठेवीवर बंधनाचा विचार नाही!

काळ्या पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Updated: Nov 25, 2016, 08:22 PM IST
सोन्याच्या वैयक्तिक ठेवीवर बंधनाचा विचार नाही! title=

नवी दिल्ली : काळ्या पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर सोन्याच्या ठेवी आणि बेनामी संपत्तीवर कारवाई करण्यात येईल, अशा चर्चा होत्या. या सगळ्या चर्चांवर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

घरामध्ये असणाऱ्या म्हणजेच वैयक्तिक सोनाच्या ठेवींवर बंधनं आणण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, अशी बातमी पीटीआयनं अर्थमंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, तसंच त्यांचं टेन्शनही कमी झालं आहे.