मुंबई : शहीद एम एन राय यांच्यावर काल अत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांची अकरा वर्षांची मुलगी अल्का रायने आपल्या पिताला श्रद्धांजली वाहिली.
अल्काने जेव्हा राय यांचं अंतिम दर्शन घेतलं, तेव्हा तिने घोषणा दिली, 'होगा के नही होगा, होके रहेगा' यावेळी अल्काच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती.
यावेळी एम एन राय यांच्या पत्नीलाही रडू कोसळलं, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न सेनाप्रमुखांनी केला, यावेळी सेना प्रमुखांना राय यांच्या पत्नीने प्रश्नही केला, का मारून टाकलं असेल त्यांना?
यावेळी त्यांचे वडिल आणि भाऊही उपस्थित होते, राय यांचा सहा वर्षांचा मुलगाही आपल्या वडिलांना शेवटचा निरोप देण्यासाठी आला होता, पण वयाच्या मानाने हे सर्व त्यांच्यासाठी कळण्यापलिकडे होतं.
शहीद एमएन राय यांचा व्हॉटस अॅपवरचा शेवटचा मेसेज
जिंदगी में बडी शिद्दत से निभाओ अपना करिदार, की परदा गिरने के बाद भी तालियाँ बजती रहे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.