३० वर्षानंतर देशसेवेतून निवृत्त होणार आयएनएस विराट

जवळपास ३० वर्ष देशाच्या समुद्र सीमेचं रक्षण करणारी INS विराट सोमवारी देशसेवेतून निवृत्त होणार आहे. आज एका कार्यक्रमातून तिला निरोप दिला जाणार आहे.

Updated: Mar 6, 2017, 10:15 AM IST
३० वर्षानंतर देशसेवेतून निवृत्त होणार आयएनएस विराट title=
मुंबई : जवळपास ३० वर्ष देशाच्या समुद्र सीमेचं रक्षण करणारी INS विराट सोमवारी देशसेवेतून निवृत्त होणार आहे. आज एका कार्यक्रमातून तिला निरोप दिला जाणार आहे.
 
आयएनएस विराट ही युद्धनौका १९८७ पासून सेवेत आहे. विराटने २७ वेळा जगाला फेरी मारली आहे. INS विराट १२ मे १९८७ मध्ये नेवीमध्ये आली. जलमेव यस्य, बलमेव तस्य' असं या युद्धनौकेचं घोषवाक्य होतं. याचा अर्थ आहे ज्याचं समुद्रावर अंकुश तो सर्वात बलवान. हे घोषवाक्य सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात आणलं होतं.
 
जगात सर्वात अधिक काळ देशसेवेत असल्याने या युद्धनौकेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. या कार्यक्रमात विराय या युद्धनौकेवर काम केलेल्या अधिकारी सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये ब्रिटनचे काही अधिकारी देखील असणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान आर्मी पोस्टल सर्विसकडून विशेष लिफाफा आणि विराटच्या इतिहासवर एक पुस्तक देखील प्रकाशिक केलं जाणार आहे.