चेन्नई : जयललिता यांची तामिळनाडू विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झालीय. एआयएडीएमकेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तामिळनाडूतल्या चेन्नईत झालेल्या बैठकीत जयललिता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. त्यामुळं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून जयललिता उद्या पाचव्यांदा शपथ घेणार आहे.
जयललिता यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मिठाई वाटत जल्लोष केला. विद्यमान मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.
राज्यपाल के. रोसय्या यांच्याकडे पनीरसेल्वम यांनी राजीनामा सुपूर्द केलाय. चेन्नईतले सर्व रस्ते जयललितांच्या समर्थकांनी फुललेले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी जयललितांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं चित्र चेन्नईत दिसतयं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.