केजरीवालांच्या वकिलाचं मानधन सरकारच्या तिजोरीतून?

भाजपनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Updated: Apr 4, 2017, 08:55 PM IST
केजरीवालांच्या वकिलाचं मानधन सरकारच्या तिजोरीतून?  title=

नवी दिल्ली : भाजपनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केलाय. जेटली अब्रनुकसानीप्रकरणी खटल्याच्या सुनावणीसाठी वकीलाचं मानधन सरकारच्या तिजोरीतून देण्याची केजरीवाल यांची इच्छा असल्याचा आरोप भाजपनं केलाय. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केलाय.

अरुण जेटली यांनी केजरीवालांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केलाय. या प्रकरणात प्रसिद्ध वकिल राम जेठमलानी केजरीवाल यांचे वकिल आहेत. जेठमलानी यांनी आतापर्यंतच्या न्यायालयीन लढाईसाठी 3 कोटी 42 लाखांचे रुपयांचे बिल लावलंय.

मुख्यमंत्री म्हणून केजरीवालांनी जी विधाने केली त्यावर हा खटला दाखल झालाय. त्यामुळे सरकारी तिजोरीतून हा खर्च उचलावा अशी भूमिका दिल्ली सरकारची आहे. या प्रकरणी आता नायब राज्यपालांनी सॉलिसिटर जनरल यांचं मत मागवलंय.