इंदोर : नोटाबंदीनंतर 'कॅशलेस' ट्रान्झक्शनची प्रसिद्धी आणि मागणी मोठ्या प्रमाणात झाली... आता तर अपहरणकर्त्यांकडूनही 'कॅशलेस'ची मागणी सुरू झाल्याचं निदर्शनास येतंय.
मध्यप्रदेशात ही घटना घडलीय. अपहरणकर्त्यांनी मथुरेतून एका व्यक्तीचं अपहरण करत या व्यक्तीच्या मालकाकडे पैशांची मागणी केली... पण, ही खंडणी आपल्याला 'कॅशलेस' मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली. 'पेटीएम'च्या माध्यमातून आपल्याला 30 हजार रुपये ट्रान्सफर केले जावेत, अशी मागणी त्यांनी केली.
'जस्ट डायल'च्या माध्यमातून त्यांनी या व्यक्तीच्या मालकाशी संपर्क केला होता. मथुरेच्या एका कॉलेजमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी व्यापाऱ्याचा सहकारी त्यांच्याकडे पोहचला तेव्हा या बदमाशांनी त्याचं अपहरण केलं.
व्यापाऱ्यानं 30 हजार रुपये पेटीएमच्या माध्यमातून ट्रान्सफर केल्यानंतर या अपहरणकर्त्यांनी अपहरण केलेल्या व्यक्तीच्या पेटीएम अकाऊंटमधूनही पाच हजार रुपये गायब केले.
या प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यानं केलाय.