चिथावणीखोर भाषणामुळे अकबरुद्दीन ओवेसींना अटक करण्याचे आदेश

बिहारमध्ये अवघ्या सहा जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लेमीन म्हणजेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. 

Updated: Oct 7, 2015, 01:30 PM IST
चिथावणीखोर भाषणामुळे अकबरुद्दीन ओवेसींना अटक करण्याचे आदेश title=

पाटना, बिहार: बिहारमध्ये अवघ्या सहा जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लेमीन म्हणजेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. 

आणखी वाचा - अशा मंत्र्याला मोदींनी लाथ मारुन बाहेर काढावे : ओवेसी

किशनगंज जिल्हा प्रशासनानं आयपीसी कलम १४४, १५३ ए आणि १८८ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यावर कारवाई करत किसनगंज राजीव रंजन यांनी ओवेसींच्या अटकेचे आदेश दिले आहेत. AIMIM चे नेते अकबरुद्दीन ओवेसींवर कोचाधामन विधानसभा क्षेत्रात सोंथा हाटमध्ये सोमवारी एका निवडणूक सभेतदरम्यान चिथावणीखोप भाषण केल्याचा आरोप आहे. 

खासदारांविरोधात टीका, पंतप्रधान मोदींनी म्हटलं राक्षस

कोचाधामन विधानसभा क्षेत्रात एमआयएमचे उमेदवार अख्तरुल इमान यांच्या प्रचारासाठी अकबरुद्दीन ओवेसीनं वादग्रस्त वक्तव्य केलं. गुजरात दंगलीबाबत बोलत पंतप्रधान मोदींना राक्षस म्हटलं.

आणखी वाचा - बिहार विधानसभा एमआयएम लढविणार : ओवेसी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.