नवी दिल्ली : मॅगी बनविणाऱ्या नेस्ले कंपनी आता अन्न आणि औषध प्रशासनाने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसीमुळे अडचणीत आली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनचे आयुक्त पी.पी सिंह यांनी नेस्ले विरोधात नोटीस पाठवण्यास संमती दिली आहे. बोराबांकी अन्न सुरक्षा अधिकारी व्ही.के. पांडे यांनी आज किंवा पुढच्या आठवड्यापर्यत केस दाखल होण्याचे म्हटले आहे.
मॅगीच्या परिक्षण नमुन्यामध्ये शीस आणि अजिनोमोटो यांचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केला होता. मात्र कंपनीने कोणत्याही प्रकारचे विधान केलं नाही. युनियन ग्राहक अफेअर्स मिनिस्ट्रिने अन्न सुरक्षा आणि दर्जाबाबत केंद्रिय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.