खुशखबर ! आता फ्रीमध्ये मिळवा आयटी रिटर्न फाईल

जर तुम्हाला तुमची आयटी रिचर्न फाईल बनवायची आहे तर आता तुम्हाला यासाठी कोणताही खर्च येणार नाही आहे. आता तुम्ही फ्रीमध्ये आयटी रिटर्न फायल बनवू शकणार आहात. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या एजंटची मदत घेण्याची गरज नाही. कारण आता आयकर विभागाशिवाय बँक देखील ही सेवा तुम्हाला देणार आहे..

Updated: Jul 3, 2016, 05:47 PM IST
खुशखबर ! आता फ्रीमध्ये मिळवा आयटी रिटर्न फाईल title=

मुंबई : जर तुम्हाला तुमची आयटी रिचर्न फाईल बनवायची आहे तर आता तुम्हाला यासाठी कोणताही खर्च येणार नाही आहे. आता तुम्ही फ्रीमध्ये आयटी रिटर्न फायल बनवू शकणार आहात. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या एजंटची मदत घेण्याची गरज नाही. कारण आता आयकर विभागाशिवाय बँक देखील ही सेवा तुम्हाला देणार आहे..

जर तुमचं एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जावून तुम्हाला लॉग इन करुन एक अकाऊंट तयार करायचं आहे. अकाऊंट तयार झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म 16 अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमची सगळी माहिती तिथे भरली जाईल. एसबीआय शिवाय एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय, कॅनरा, स्टॅण्डर्ड बँक या सोबतच अनेक बँका तुम्हाला ही सुविधा पुरवणार आहेत. तुमचं जर या बँकामध्ये अकाऊंट आहे तर तुमच्यासाठी ही गोष्ट खूपच सोपी आहे.

ज्या व्यक्तींचं नेटबँकिंग नाही आहे त्या व्यक्तींना आयटी डिपार्टमेंटने बँक अकाउंट आणि एटीएम बेस्ड वॅलिडेशन सुविधा लॉन्च केली आहे. ही नवी सुविधा डिर्पाटमेंटच्या ई फायलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे.