मंगळयानाचे 11.7 कोटी किलोमीटर अंतर पार

Updated: Jun 25, 2014, 05:12 PM IST
मंगळयानाचे 11.7 कोटी किलोमीटर अंतर पार title=

बंगळूरुः भारताचे मंगळ अवकाशयानने पृथ्वीपासून 11.7 किलोमीटरच्या अंतर पार केले आहे. त्यानंतर 'लाल ग्रह'च्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी पुढचे 92 दिवसामध्ये 2.4 कोटी किलोमीटर अंतर अजून पार करायचे आहे. 

भारतीय 'अंतराळ संशोधन संस्था' (इसरो) ने मंगळवारी सांगितले की, मार्स आर्बिटर मिशन (एमओएम) अवकाश गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रक्षेपित केले होते. हे अवकाश 23 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने पुढे जात आहे. त्याशिवाय एमओएम आणि मंगळ यांच्या दरम्यान सद्यस्थितीत 2.4 कोटी किलोमीटर ऐवढे अंतर आहे. 

अंतराळ संशोधन संस्थेने मार्स आर्बिटर मिशनच्या फेसबुक पेज वर लिहीले गेले की, 'एमओएमकडून पाठविण्यात येत असणारे संचार सिग्नलला जमिनीवर पोहचण्यासाठी साडे सहा मिनीटे वेळ लागतो. मंगळ्याच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी अजूनही 92 दिवस लागणार आहेत.'
  
इस्त्रोने 11 जूनला सायंकाळी साडेचारला आपला मार्स आर्बिटर अवकाश यानावर दुसरा 'ट्रेजेक्टरी करेक्शन मनुवर' (टिसीएम 2) केला होता. दोन्ही मिळून हे काम केले जाते त्यामुळे अवकाश यान आपल्या निश्चित मार्गावर पुढे जाऊ शकेल. सप्टेंबरमध्ये अवकाश यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याआधी टीसीएम केले जाईल. 
 
या वर्षी 24 सप्टेंबरपर्यंत लाल ग्रहाच्या वातावरणात पोहचण्याचे ट्रार्गेट घेऊन या महत्त्वाकांक्षी अवकाशयानला गेल्यावर्षी 5 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशचे श्री हरिकोटा येथून प्रक्षेपित केले होते. या वैज्ञानिक समुदायाला 450 कोटी रुपये खर्च येणाऱ्या या परियोजनेमुळे ग्रहांच्या शोधासाठी चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.