शपथ घेण्यापूर्वीच आमदाराचा मृत्यू

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी विभागातून निवडून आलेले आमदार वसंत कुशवाह यांचे सोमवारी सकाळी हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. वसंत कुशवाह पहिल्यांदा राष्ट्रीय लोकसमता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवून जिंकून आले होते. मात्र आमदाराकीची शपथ घेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. 

Updated: Dec 1, 2015, 01:00 PM IST
शपथ घेण्यापूर्वीच आमदाराचा मृत्यू title=

बिहार: बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी विभागातून निवडून आलेले आमदार वसंत कुशवाह यांचे सोमवारी सकाळी हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. वसंत कुशवाह पहिल्यांदा राष्ट्रीय लोकसमता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवून जिंकून आले होते. मात्र आमदाराकीची शपथ घेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. 

वसंत कुशवाह आजपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रविवारी रात्री पाटणा येथे पोहोचले. आज ते आमदारकीची शपथ घेणार होते. मात्र सकाळच्या सुमारास त्यांना हृद्यविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्राला सुरुवात होताच कुशवाह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तसेच त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी पाटणाच्या पक्ष कार्यालयात ठेवण्यात आले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.