'जनधन'मधल्या रकमेची एफडी होणार?

आठ नोव्हेंबरनंतर जनधन खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेची एफडी करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

Updated: Dec 12, 2016, 04:51 PM IST
'जनधन'मधल्या रकमेची एफडी होणार? title=

नवी दिल्ली : आठ नोव्हेंबरनंतर जनधन खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेची एफडी करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. काळा पैसावाल्यांना अद्दल घडवण्यासाठी मोदी सरकार हे पाऊल उचलू शकतं असं बोललं जात आहे.

आठ नोव्हेंबरला पंतप्रधानांनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर जनधन खात्यामध्ये तब्बल 21 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. काळा पैसा धारकांनी त्यांचाकडचे पैसे जनधन खात्याच्या माध्यमातून पांढरे केल्याचा केंद्र सरकारला संशय आहे. यामुळे मोदी सरकार हे पाऊल उचलू शकतं. हे एफडी किती कालावधीचं असणार याबद्दल मात्र अजून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.