'ताजमहाला'त दफन केलीय बेगम मुमताजची 'ममी'!

जगभरात प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखलं जाणारं ताजमहाल हे एक 'ममी महल' असल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय. प्रेमाचं प्रतिक समजल्या 'ताजमहाल'मध्ये मुगल बादशाह शाहजहानं याच्या पत्नीचं शव 'ममी'च्या रुपात दफन करण्यात आलंय, असा उल्लेख यात करण्यात आलाय.

Updated: Jan 29, 2015, 05:46 PM IST
'ताजमहाला'त दफन केलीय बेगम मुमताजची 'ममी'! title=

आगरा : जगभरात प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखलं जाणारं ताजमहाल हे एक 'ममी महल' असल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय. प्रेमाचं प्रतिक समजल्या 'ताजमहाल'मध्ये मुगल बादशाह शाहजहानं याच्या पत्नीचं शव 'ममी'च्या रुपात दफन करण्यात आलंय, असा उल्लेख यात करण्यात आलाय.

मुमताज हिचं दफन कसं करण्यात आलं, या रहस्यावरून अजूनही पडदा उठलेला नाही. आपल्या पत्नीच्या दफनविधीसाठी शाहजहांननं सतराव्या शतकात इथं मकबऱ्याच्या रुपात ताजमहालचं निर्माण केलं होतं. आपल्या 14 व्या अपत्याला जन्म देण्यासाठी बुरहानपूर गेलेल्या मुमताजचं इथं निधन झालं होतं. 


ताजमहालमधला मकबरा

'ताजमहल या ममी महल' या वादग्रस्त ई-पुस्तकाचे लेखक अफसर अहमद यांच्या म्हणण्यानुसार, ताजमहालबद्दल अनेक सत्य लपवण्यात आलेत. ताजमहालचं निर्माण सुरू असताना हे सत्य उघड झालं असतं तर ही वास्तू निर्माण होणंच अशक्य झालं असतं. पत्रकार आणि लेखक असलेल्या अहमद यांनी आपल्या पुस्तकात मुमताज यांच्याबाबतीत अनेक अज्ञात गोष्टींचा खुलासा केलाय.

मुमताज हीचं शव ममीच्या रुपात जतन करण्यात आलं... अंतिम वेळेस मुमताजच्या 'ममी'चं दफन करण्याच्या अगोदर 'अमानत घरात' दोन-तीन वेळा दफन केलं गेलं होतं. परंतु, यावेळेत मुमताजचं शव कसं जतन करण्यात आलं होतं? यावेळी, मुघलांनीही इजिप्तमध्ये शव जतन करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती वापरली होती? त्यांना ही पद्धत माहित होती? आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे... की आजही मुमताजचं शव संरक्षित आहे? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला गेलाय. 

लेखकाच्या म्हणण्यानुसार, वाचकांना मुमताजचा मृत्यू आणि दफनविधीमागचं सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.