लखनऊ : देशात जातीय तणावाच्या घटना वाढत असतांना , लखनऊ विद्यापिठाच्या दोन मुस्लिम, युवकांनी नवरात्रीचे उपवास ठेवले आहेत, शहाबुद्दीन उर्फ समीर आणि त्याचा मित्र अब्दुल कलीम यांनी शेवटच्या दिवशी उपवास ठेवण्याची घोषणा केली आहे.
उत्तर भारतात हिंदू मोठ्या प्रमाणात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी उपवास ठेवतात. समीर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेले अब्दुल हमीद यांचा जवळचा नातेवाईक आहे.
जर हिंदू आणि मुसलमानांनी मिळून आपले उत्सव साजरे केले तर दादरी सारख्या घटना घडणार नाहीत, मी रोजा ठेवतो, तर नवरात्रीचेही उपवास ठेऊ शकतो, मी दिवाळी देखील साजरी करतो, ती देखील मनापासून, असं समीरने म्हटलं आहे.
अब्दुल हमीद यांची पत्नी, ही समीरची आजी आहे, ती नेहमी म्हणते, कोणताही धर्म इतर धर्माबाबत वाईट म्हणत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.