नवी दिल्ली : नवरात्रीचा उत्साह आजपासून सुरू झाला आहे, पहिल्या दिवशी माता शैलपुत्री म्हणजेच निसर्ग देवतेचं रूप असलेली ही देवी आहे. देवीच्या नऊ रूपांपैकी एक शैलपुत्री आहे, देवीला पार्वती देखील म्हटलं जातं.
हिंदू कथेनुसार शैलीदेवी ही पहाडाची मुलगी मानली जाते. तिला सती भवानी देखील म्हणतात, पार्वती, हिमावती अशी तिची नावं आहे.
देवी शैलपुत्री ही ब्रह्मा, विष्णू आणि शिवाच्या शक्तीचं प्रतिक आहे. जी नंदीवर स्वार आहे, आणि जी कमळावर विराजमान आहे. तिच्या हातातही कमळ दिसून येतं. ही शैलपुत्री माताची अनोखी शक्ती आहे, अध्यात्मिक शक्तीचं ती प्रतिक मानली जाते.
देवी शैलपुत्री
चांगल आरोग्य, भयमुक्ती शैलपुत्री माता देते असं म्हटलं जातं, आराधना केल्याने आरोग्य स्थिर आणि जीवन नीडर होतं. व्यक्ती आव्हानांनी घाबरत नाही, तर त्याच्या समोरील आव्हानांचा सामना करून विजय मिळवतो.
मां शैलपुत्री का निर्भय आरोग्य मंत्र
विशोका दुष्टदमनी शमनी दुरितापदाम्।
उमा गौरी सती चण्डी कालिका सा च पार्वती।।
या मंत्राचा १०८ वेळा उच्चार केल्याने भयमुक्ती आणि चांगलं आरोग्य लाभतं असं म्हटलं जातं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.