समाजवादी पार्टी-काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं आहे.

Updated: Jan 21, 2017, 10:53 PM IST
समाजवादी पार्टी-काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं title=

लखनऊ : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं आहे. जागावाटपावरुन सपानं अचानक यूटर्न घेतल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे. तर महायुती तुटण्यास सपानं काँग्रेसलाच जबाबदार धरलंय.

काँग्रेसनं उत्तर प्रदेशात 120 जागांची मागणी केली होती, मात्र समाजवादी पार्टी काँग्रेससाठी केवळ 100 जागा सोडण्यास तयार झाली. गुरुवारी सपानं काँग्रेसला शंभरहून अधिक जागा देण्याचं मान्य केलं होतं, पण जागावाटपाबाबत अचानक यूटर्न घेतल्यानं काँग्रेसच्या वर्तुळात नाराजीचा सूर आहे. तर युतीसाठी काँग्रेस आग्रही नसल्याची टीका सपाकडून करण्यात येतीये.

शुक्रवारी अखीलेश यादव यांनी 79 उमेदवारांची यादी काँग्रेस हायकमांडकडे सोपवली होती. ज्यांच्या नावांचा समावेश यादीत आहे त्यांचे फॉमही भरण्यात आलेत. तसंच उद्यापर्यंत अखिलेश यादव समाजवादी पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे.

एकीकडे काँग्रेससोबत युतीची भाषा करणा-या सपानं मथुरा, बिलासपूर, किडवाईनगर, श्यामली यांच्यासह काँग्रेसचे आमदार असणा-या आठ मदतारसंघात उमेदवार जाहिर केलेत.

आघाडीचा निर्णय झाला नसून जागावाटप झाल्यानंतर आमचे उमेदवार माघार घेतील असं सपाकडून सांगण्यात येतंय. सपाच्या या चालीमुळे काँग्रेच्या गोटात मात्र तणाव वाढतच चाललाय, त्यामुळे आघाडी होण्यापूर्वीच सपा आणि काँग्रेसमध्ये बिघाडीचं चित्र पहायला मिळतंय.