महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीच्या सुट्या योगींनी केल्या रद्द

आज उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला शाळा कॉलेजना देण्यात येणाऱ्या सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केला आहे.

Updated: Apr 14, 2017, 02:57 PM IST
महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीच्या सुट्या योगींनी केल्या रद्द title=

लखनऊ : आज उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला शाळा कॉलेजना देण्यात येणाऱ्या सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केला आहे.

उत्तर प्रदेशात महापुरुषांच्या नावानं सर्वाधिक सुट्ट्या दिल्या जातात. महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला सुटी देण्यापेक्षा त्यादिवशी विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये बोलावून दिवसातले दोन तास त्या महापुरुषाची माहिती देण्याची सूचना यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू करण्याची घोषणाही यावेळी केली आहे.