नवी दिल्ली: देशाचं आर्थिक बजेट सादर व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. पण त्याआधी मोदी सरकारनं नागरिकांना खुषखबर दिली आहे. आता कार्ड किंवा डिजिटल पेमेंट केलं तर कोणताही सरचार्ज, सर्व्हिस टॅक्स किंवा सुविधा शुल्क लागणार नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. कर चुकवेगिरी आणि रोख रक्कमेचे व्यवहार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.