मुंबई : तुम्ही जर आता साधारण २० किंवा ३० वर्षांचे असाल तर तुमच्या आईवडिलांनी तुम्ही शाळेत असताना तुम्हाला एखाद दुसरा रुपया दिल्याचं आठवत असेल. कधी कधी तोच रुपया तुम्ही खर्च न करता जपून ठेवला असेल तर आज मात्र तो रुपया तुम्हाला लाखो रुपये देऊ शकतो. खरं तर आजकाल एक रुपयात चॉकलेटही मुश्किलीने मिळतं, पण तरी तुम्हाला लाखो रुपये मात्र मिळू शकतात.
तुमच्याकडे असलेली जुनी नाणी तुम्हाला लखपती बनवू शकतात. हेच काय, तर तुमचं नशीब चांगलं असेल तर त्याची किंमत तीन लाखांपर्यंत जाऊ शकते. असंच काहीसं घडतंय आंध्र प्रदेशात. इथल्या एका शहरात राहणाऱ्या बी चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीने, अशी नाणी विकण्याचा निर्णय घेऊन शहरातील एका रस्त्यावर स्टॉल लावला. त्यांच्याकडे असलेली काही नाणी त्यांनी या स्टॉलवर विकली.
आता यावरच ते वर्षभर कमाई करतात. मुंबईच्या टाकसाळीत १९७३ साली या नाण्याची निर्मिती झाली होती. या नाण्याची तब्बल तीन लाखांना विक्री झाली आहे. मुंबईत तयार झालेल्या नाण्यांवर वर्षांखाली एक चौकट छापलेली असते. त्यावरुन हे नाणं मुंबईत तयार झालं होतं, याची खात्री करता येते.
जगभरातील अनेक लोक अशी नाणी विकत घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यासाठी अनेक ऑनलाईन पोर्टल्स चालवली जातात. या पोर्टल्सच्या माध्यमातूनही नाणी विकली जाऊ शकतात. तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांकडे अशी नाणी असतील तर तुम्ही त्यांच्या संमतीने ती विकू शकता.