नवी दिल्ली : नोटबंदीनंतर काळा पैसावाल्यांना आता दुसरा दणका बसणार आहे. आजपासून ऑपरेशन क्लीन मनीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय. त्यात 60 हजार नागरिकांच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी होणार आहे.
या 60 हजार नागरिकांपैकी तेराशे खाती जोखमीची असल्याचं आयकर विभागानं म्हटलयं. त्याचप्रमाणे नोटाबंदीच्या काळातले 6 हजार मालमत्ता व्यवहार आयकर विभागाच्या चौकाशीच्या फेऱ्यात सापडणार आहेत.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर नऊ नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या काळात केंद्रीय आयकर विभागानं 9 हजार 334 कोटी रुपयाचं अघोषित उत्पन्न पकडलंय. ओपरेशन क्लीन मनी अंतर्गत ही कारवाई करण्यात आलीय.