नवी दिल्ली : नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासमोर होळीच्या कार्यक्रमात गायत्री मंत्र म्हणून प्रकाश झोतात आलेली गायिका नरोदा मालिनी यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आवडत असल्याचे स्वतः नरोदा यांनी म्हटले आहे.
सध्या नरोदा छत्तीसगड येथील रायपूरमध्ये सिंधी समाजाचे तिर्थक्षेत्र असलेल्या शदाणी दरबारमध्ये एका कार्यक्रमासाठी भारतात आल्या आहेत. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या, यूपीमध्ये महंत मुख्यमंत्री झाल्याने राज्याचे कल्याण होणार नरोदा म्हटल्या मी भारतात पाऊल ठेवले तेव्हा मला यूपीच्या सीएमबद्दल माहिती पडले.
नरोदा योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय प्रतिमा आणि आध्यामिक अध्ययनाने प्रभावित झाल्या आहेत. नरोदा म्हणाल्या राजकारणात धर्माचा काही भाग असायला पाहिजे. त्यामुळे राजकारण स्वच्छ आणि लोक कल्याणकारी होते.
नरोदा यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून गाणे गायला सुरूवात केली होती. त्यांच्या कुटुंबात गायनाची परंपरा नाही.. पाकिस्तानातील अनेक भागात संगीत आयोजनात सहभागी असतात. त्या सिंधी उर्दू आणि पंजाबी भाषेत गाणी म्हणतात.