नवी दिल्ली : वाहन चालकांसाठी एक खुशखबर आहे, लवकरच वाहन चालवणाऱ्यांना पेट्रोल-डिझेलसाठी कमी पैसे द्यावे लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे भारतातही कच्चा तेलाच्या किंमती ११ वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर आल्या आहे. तेल कंपन्या आणि सरकारला याचा फायदा होणारच आहे. तसेच किळकोळ विक्री बाजारातही पेट्रोल-डिजेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानुसार भारतात कच्चा तेलाची किंमत प्रति बॅरल ३८.६१ डॉलर आहे, जी मागील ११ वर्षातील सर्वात खालच्या स्तरावरील किंमत आहे. २००४ मध्ये कच्चा तेलाची किंमत ३८.६२ डॉलर येवढी होती.
भारतीय अर्थव्यवस्थेला यांचा लाभ होऊ शकतो. तसेच सरकारचे सब्सिडी बिल ही कमी होईल. यामुळेच पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.