कोईम्बतूर : पतीला संपवण्यासाठी खोलीत साप सोडण्यात आला. साप सोडण्यामागे पत्नीचं कटकारस्थान होतं, साप सोडण्याचं कारणंही तसं भलतंच होतं. साप सोडल्याचं नंतर समोर आलं, जेव्हा पत्नीने पतीची हत्या केल्याचं स्पष्ट झालं.
विशेष म्हणजे या हत्येमध्ये सर्पदंशाचा प्रयत्न झाला. तामिळनाडूतील कोईमबतोर शहरात हे हत्याकांड घडले. पतीचा मृत्यू ही हत्या नसून दुर्घटना वाटावी यासाठी सापाचा वापर केला गेला. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली.
अशी आहे सापवाली स्टोरी...
सुंदरमचे शारदा बरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. सुंदरम या प्रकरणातला आरोपी आहे. शारदला प्रेमसंबंधात पती सक्तीवेलचा अडथळा होता.
शारदाने यासाठी पती सक्तीवेलला संपवण्यासाठी सुंदरमला १५ हजार रुपये दिले. नंतर जिम काढण्यासाठी तिने सुंदरमला ५ लाख देण्याचे आश्वासन दिलं.
सापाचा विषप्रयोगाचा प्रयत्न या प्रकरणात झाला असल्याचं तपासादरम्यान समोर आलं. कारण दोन महिन्यांपूर्वी त्यांनी पत्तानपुदूर येथे १ विषारी साप पकडला आणि सक्तीवेलच्या खोलीत सोडला. पण साप सक्तीवेलला दंश न करता तिथून निघून गेला. त्यामुळे दोघांनी सक्तीवेलला मारहाण करुन संपवण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणी शारदाला अटक झाल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार ८ ऑगस्टला सुंदरम, कृष्णा आणि शारदाने लाकडी काठीने सक्तीवेलला जीव जाईपर्यंत बेदम मारहाण केली. सक्तीवेलचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह घराच्या टाकीत टाकून दिला.