नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पर्रिकर यांच्या जागी आता अर्थमंत्री अरुण जेटली संरक्षण खात्याचा पदभार स्वीकारतील.
गोव्यामध्ये भाजप सत्ता स्थापन करणार आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेतील. गोव्यात निवडून आलेल्या २१ आमदारांच्या समर्थनाचं पत्र काल राज्यपाल मृदुला सिन्हा यांना देण्यात आलं. यानंतर सिन्हांनी पर्रिकर यांना सत्ता स्थापनेसाठी बोलावलं.
गोव्यामध्ये भाजपला १३ तर काँग्रेसला १७ जागा मिळाल्या. पण गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन, महाराष्ट्र गोमांतक पक्षाचे तीन आणि दोन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे गोव्यामध्ये भाजपचं सरकार बनणार आहे.