गुरूदासपूर हल्ला: शहीद एसपी बलजित सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार

पंजाबमधील गुरदासपूर इथं अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिक्षक बलजित सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंजाबचे महासंचालक सुमेध सिंग सैनी यांनी बलजित सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. 

PTI | Updated: Jul 29, 2015, 11:33 PM IST
गुरूदासपूर हल्ला: शहीद एसपी बलजित सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार title=

कापूरथला, पंजाब: पंजाबमधील गुरदासपूर इथं अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिक्षक बलजित सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंजाबचे महासंचालक सुमेध सिंग सैनी यांनी बलजित सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. 

दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी बलजित सिंग यांच्या कुटुंबियांशी बातचित केल्यानंतरच त्यांचे कुटुंबिय त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले. 

बलजित सिंग यांच्या पत्नीनं आपल्या तिन्ही मुलांसाठी नोकरीची मागणी केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.