मी यापुढे वकील नव्हे, तर न्यायाधिश- राहुल गांधी

उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच जयपूरच्या एआयसीसी बैठकीत भाषण केलं. अत्यंत ओघवत्या शैलीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 20, 2013, 09:27 PM IST

www.24taas.com, जयपूर
उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच जयपूरच्या एआयसीसी बैठकीत भाषण केलं. अत्यंत ओघवत्या शैलीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
आपण यापुढे वकिलाच्या नव्हे, तर न्यायाधिशाच्या भूमिकेतून काम करणार असल्याचं रोखठोक मत मांडून, पक्षांशी गद्दारी करणा-यांची हयगय केली जाणार नसल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. तसंच तिकीट वाटपावरून जे वरून निर्णय होतात त्यावरही त्यांनी टीका केली. सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढवणार असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं. कोणताही निर्णय घेतांना तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय यापुढे होणार नसल्याचं राहुल म्हणाले.
काँग्रेसमध्ये देशाचा DNA असल्याचही त्यांनी सांगितलंय. जयपूरमध्ये सुरु असलेल्या काँग्रेसच्या चिंतन बैठकीत राहुल गांधींनी अनेक मुद्यांना हात घातलाय.