रेल्वेतील ब्लँकेट्स म्हणजे रोगराईचं भांडार

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या अंथरुणांविषयी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Updated: Feb 27, 2016, 12:54 PM IST
रेल्वेतील ब्लँकेट्स म्हणजे रोगराईचं भांडार title=

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या अंथरुणांविषयी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रेल्वे प्रवासामध्ये मिळणारी ही ब्लँकेट्स म्हणजे रोगराईचं भांडार असू शकतात असं यातून समोर आलंय.

रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या काळात एका प्रश्नाला उत्तर देताना ही ब्लँकेट्स तब्बल दोन महिन्यातून एकदाच धुतली जातात अशी धक्कादायक माहिती दिली आहे. रेल्वे प्रवासात खासकरुन एसी डब्यात दोन पांढऱ्या चादरी, एका उशी आणि एक ब्लँकेट असा सेट दिला जातो. यातील ब्लँकेट्सविषयी ही माहिती पुढे आली आहे.

यातील पांढऱ्या चादरी आणि उशीची कव्हर्स मात्र प्रत्येक प्रवासानंतर धुतली जातात तर ब्लँकेट्स दर ६० दिवसांनी धुतली जातात. याचाच अर्थ असा की ही ब्लँकेट्स किमान ६० जण न धुता वापरतात. यातील अनेक ब्लँकेट्सचा वापर करणारे काही गंभीर आजारांचे रुग्णही असू शकतात. त्यांच्याकडूण या आजारांचे ब्लँकेट्समार्फत संक्रमण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

या दिल्या जाणाऱ्या सोयींच्या खर्चाचा समावेश प्रवाशांच्या तिकिटातून वसूल केला जातो. देशभरात सध्या रेल्वेच्या ४१ लाँड्री कार्यरत आहेत. पुढील दोन वर्षांत त्यांत आणखी २५ लाँड्रींची भर पडणार आहे.